Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवादबीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटीलशाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पजिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणार

जाहिरात

 

मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद

schedule27 Jun 26 person by visibility 15 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेची पुनर्बांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदारसो व नंदकुमार चिले यांचे हस्ते संघटनात्मक बांधणीला सुरुवात झाली
         राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून लक्ष्मी विलास पॅलेस येथील जन्मस्थळावरील शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले. यानंतर शासकीय विश्रामगृहावर संपूर्ण दिवसभर पक्षाचे माजी पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसेच पक्षामध्ये नव्याने काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांशी वैयक्तिकरित्या थेट संवाद साधण्यात आला. 
       पक्षामध्ये नव्याने काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिकरित्या संपर्क अध्यक्षांशी संपर्क साधावा ज्याद्वारे काही जुन्या लोकांना सामावून घेऊन काही नवीन उमद्या चेहऱ्याना संधी देण्यात येईल असे आवाहन संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदारसो यांनी केले.
        याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, रवी गोंदकर,अभिजीत पाटील, संजय चौगले , प्रताप पाटील, राजेंद्र निकम, विजय करजगार, प्रभात साबळे, अभिजित राऊत, संजय पाटील, निलेश आजगावकर, राजन हुल्लोळी,सुनील तुपे, राहुल खाडे, गणेश तेरवाडे ,अरविंद कांबळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes