जिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
schedule26 Jun 26 person by visibility 56 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : स राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी 26 जून 2026 रोजी जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण केले.
या कार्यक्रमास उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र माने , कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. मेश्राम तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी "नशामुक्त भारत अभियान" अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प केला. नशामुक्त भारत"** ही शपथ घेतली. समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून निरोगी, सुदृढ आणि सक्षम भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा तसेच सामाजिक समता, शिक्षण, लोककल्याण आणि सुशासनाची मूल्ये अधिक बळकट करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.