Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीरलाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षण

जाहिरात

 

भाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणार

schedule25 Jun 26 person by visibility 76 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने सोमवारी  29 जून 2026 रोजी शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली .

    सोमवारी  सकाळी दहा वाजता धैर्यप्रसाद हॉल  येथे एकत्र जमून शक्ती प्रदर्शनाने सहाय्यक निबंधक (दुग्ध )कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी जाऊन ठराव दाखल करण्याची नियोजन केले आहे. मंत्री  चंद्रकांत  पाटील,खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक,आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील माजी, आमदार सुरेशराव हाळवणकर, माजी आमदार संजय  घाटगे,  समरजितसिंह घाटगे, गोकुळच्या संचालिका शौमिक महाडिक, प्रवीणसिंह पाटील (मुरगूडकर ) गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, स्वाती कोरी, अशोकराव चराटी, के एस चौगुले, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, हंबीरराव पाटील या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुर येथील धैर्यप्रसाद हॉल पासून सहाय्यक निबंधक कार्यालय दुग्ध कोल्हापूर इथ पर्यंत शक्ती प्रदर्शन करत सर्व ठराव धारक ठराव दाखल करण्यासाठी जाणार आहेत. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि ठराव धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष  पाटील यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes