Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटीलशाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पजिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!

जाहिरात

 

बीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवाद

schedule26 Jun 26 person by visibility 27 categoryउद्योगसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल (बीएनआय), कोल्हापूर- सांगली-इचलरकरंजी शाखेतर्फे शनिवारी, २७ जून २०२६ रोजी राष्ट्रीय औद्योगिक मेळावा आयोजित केला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वृद्धिगंत करणे, राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित हा मेळावा हॉटेल सयाजी येथे होणार आहे अशी माहिती शाखेचे कार्यकारी संचालक प्रीत सत्रा व भव्या सत्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. इंडस्ट्रीयल मिक्सर ३.० या उपक्रमातंर्गत विविध राज्यातील उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक एकत्रित येत आहेत. सायंकाळी सहा वाजता ‘उद्योग संवाद’ परिसंवाद होणार आहे. यामध्ये चकोते ग्रुपचे अण्णासाहेब चकोते, चितळे ग्रुपचे मकरंद चितळे, मार्व्हलस ग्रुपचे संग्राम पाटीलहे सहभागी होणार आहेत.यानंतर उद्योगपती संजय घोडावत हे उद्योग –व्यवसाय संबंधी मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला पदमसिंह देवल, अमित मगदूम, आशिष चांदगुडे, नीरज शहा, प्रसाद धर्माधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes