Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पजिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीरलाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रम

जाहिरात

 

शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन

schedule26 Jun 26 person by visibility 9 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे अभिवादन केले. समाजसुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी निकम, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत,प्रकुलगुरू ज्योती जाधव, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीचे इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेले कार्य, सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे तसेच जातीभेद निर्मूलनासाठी घेतलेले धाडसी निर्णय यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शाहू जन्मस्थळ संग्रहालयासाठी जमीन हस्तांतरण तसेच कोल्हापूर इतिहास संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes