Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनमुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा !  महापौर म्हणाल्या, साऱ्यांनी मिळून डी.वाय. पाटील यांचे स्मारक साकारू ! !गोकुळतर्फे दूध खरेदी- विक्री दरात वाढजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदेएआय मुळे जग बदलेल , बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे - आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंतशिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेंच्या स्मृतीदिनानिमित्त बालस्केटिंगपटूतर्फे स्मृतीज्योतमंत्र्यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, रविवारच्या कार्यक्रमाचा घेतला आढावा !!शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरण

जाहिरात

 

लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

schedule08 Aug 26 person by visibility 28 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा मिळावा व भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी समस्त लिंगायत समाजातर्फे रविवारी (९ ऑगस्ट २०२६) कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. लोकशाही मार्गाने, शांततेने हे आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती संजय तेलनाडे, प्रशांत शहापुरे, सरला पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत हे आंदोलन आहे. या आंदोलनात समाजबांधवानी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले. लिंगायत समाजास  महाराष्ट्रात धार्मिक अल्पसंख्याक जाहीर करावे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत्त दर्जा देऊन एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी तसेच विनातारण कर्ज योजना  लागू करावी अशी मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला राजशेखर तंबाखे,सुभाष महाजन, नितीन पाटील, मनोजकुमार रणदिवे, मिलिंद साखरपे चारुशीला तासगावे आदी उपस्थित होते.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes