महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरण
schedule07 Aug 26 person by visibility 23 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्तह पहिली ते दहाववीच्या ७५५ विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोफत बस प्रवास पास उपलब्ध केला. या पासचे वितरण महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने महिला व बालकल्याण समिती सभापती स कौसर बागवान यांच्या वतीने महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना १५० स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे सकाळी आयोजित कार्यक्रमात उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती दिपा ठाणेकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती शिला सोनुले, पाणीपुरवठा समिती सभापती संगीता सावंत, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, गटनेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसेवक ऋतुराज क्षिरसागर, अभिजित खतकर, अश्किन आजरेकर, वैभव माने, अजय इंगवले, स्वरूप कदम, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका निलीमा पाटील, प्राजक्ता जाधव, वंदना मोहिते,अरुणा गवळी, धनश्री कोरवी, अनुराधा मुळीक, जयश्री कांबळे, अर्चना पागर, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, अजित ठाणेकर, संजय सावंत, आनंदराव खेडकर, तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
…………………..