Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, रविवारच्या कार्यक्रमाचा घेतला आढावा !!शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरणथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायिनी, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मितामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आष्ट्यात ! अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन, नूतन इमारतींचे उद्घाटन! !रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाला सरकारचे पेटंटपवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरूविद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकन

जाहिरात

 

मंत्र्यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, रविवारच्या कार्यक्रमाचा घेतला आढावा !!

schedule08 Aug 26 person by visibility 41 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सुनेत्रा पवार हे रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला गती देणाऱ्या विविध  प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
नाट्यगृहाचा मूळ ‘हेरिटेज लुक’ (ऐतिहासिक वारसा स्वरूप) कायम राखत, अत्यंत आधुनिक आणि दर्जेदार सुविधांसह या वास्तूचे सौंदर्य अधिक खुलवण्यात आले आहे. उ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नूतनीकृत केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून, यामुळे कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नवी गती मिळणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले.मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री  पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण उद्घाटन कार्यक्रम उद्या होणार आहे या पार्श्वभूमीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्य गृह आणि प्रायव्हेट हायस्कूल येथील सभा स्थळाची पाहणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत महापौर रूपा राणी निकम , खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपमहापौर अक्षय जरग, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात केवळ नाट्यगृहासह शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या इतरही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून सीपीआर रुग्णालयात झालेल्या विविध अद्ययावत कामांचे लोकार्पण,  शहरातील खेळाडूंसाठी अद्ययावत हॉकी स्टेडियम आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नव्या पार्किंग सुविधांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
 नुकतेच गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आज कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे अनेक निर्णय आणि प्रकल्प वेगाने पूर्ण केले जात असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes