Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरणथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायिनी, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मितामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आष्ट्यात ! अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन, नूतन इमारतींचे उद्घाटन! !रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाला सरकारचे पेटंटपवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरूविद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकनहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारी

schedule07 Aug 26 person by visibility 34 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या सांख्यिकी अधिकारी/ संशोधन अधिकारी (गट-ब, राजपत्रित) पदाच्या भरती प्रक्रियेत शिवाजी विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातील सांख्यिकी अधिकारी संशोधन अधिकारी  या पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीराज विठ्ठल झांबरे, आदिनाथ तुकाराम पाटील, रविंद्र एकनाथ देवरे, सोनम श्रीकांत पाटील, निकेत गणेश जाधव, स्वनिल सतीश माने, तेजश्री मनमोहन राजे आणि विद्या बाळासाहेब वालकोळी यांचा समावेश आहे. अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांच्यासह सर्व शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

या भरती प्रक्रियेत राज्यभरातून निवड झालेल्या २५ उमेदवारांपैकी शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, हे प्रमाण ३२ टक्के इतके आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची प्रभावी परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

संख्याशास्त्र अधिविभागाची गुणवत्ता अधोरेखित

संख्याशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आज केंद्र व राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रांतही विविध पदांवर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. आज आठ विद्यार्थ्यांच्या यशामुळे अधिविभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता नव्याने अधोरेखित झाली आहे. विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांसाठीही त्यांचे यश प्रेरणादायी आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक अभिनंदनास पात्र आहेत, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes