Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनमुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा !  महापौर म्हणाल्या, साऱ्यांनी मिळून डी.वाय. पाटील यांचे स्मारक साकारू ! !गोकुळतर्फे दूध खरेदी- विक्री दरात वाढजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदेएआय मुळे जग बदलेल , बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे - आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंतशिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेंच्या स्मृतीदिनानिमित्त बालस्केटिंगपटूतर्फे स्मृतीज्योतमंत्र्यांनी केली केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, रविवारच्या कार्यक्रमाचा घेतला आढावा !!शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरण

जाहिरात

 

मुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! 

schedule08 Aug 26 person by visibility 19 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाचे सध्या सुरू असलेले पुनर्बांधणीचे काम मूळ वास्तूला सुसंगत नाही. ऐतिहासिक ढाचा बाजूला ठेवून चुकीच्या पद्धतीने काम होत आहे. या दोन्ही वास्तूंचे विद्रुपीकरण सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन करू नये यासाठी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीमार्फत आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून संपूर्ण कामे अपुरे असताना विशेषतः कुस्ती मैदानाचे  व्यासपीठ काम अपुरे असताना त्यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला आहे यामध्ये  मुख्यमंत्र्यांचा दोष नाही त्यांनी शाहूंच्या प्रेमापोटी निधी दिला आहे पण त्याचा योग्य विनियोग झाला आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी या मागणीचे निवेदनही मुख्यमंत्री कार्यालयाला मेल करण्यात आले. शनिवारी सकाळी ८ वाजता मैदानात सराव करणारे शेकडो पैलवान व नागरी समिती सदस्यांनी राजर्षि शाहू महाराजांचे मोठे तैलचित्र हातात घेऊन त्याचबरोबर 'मुख्यमंत्री साहेब ...! विद्रूपीकरणाचे उद्घाटन करून पापाचे वाटे करू नका / राजर्षि शाहूंची वारसा स्थळे नष्ट करणाऱ्यांचा धिक्कार असो /  कुस्ती मैदान व  नाट्यगृहाची वाट  लावणाऱ्यांचा  धिक्कार असो असे फलक घेऊन व घोषणा देऊन अर्धवट काम असणाऱ्या कुस्ती मैदानात  फेरी मारत जोरदार घोषणाबाजी करून या ठिकाणी राजर्षि जाऊन च्या चरणी अशा भ्रष्ट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या गावात आम्ही राहतो याची आम्हाला लाज वाटते असे म्हणत आत्मक्लेष आंदोलन केले.  या आंदोलनाचे संयोजन अशोक पोवार, रमेश मोरे, वस्ताद विश्वास हारुगले, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी ,शाहीर दिलीप सावंत, प्रकाश आमते ,अमृत शिंदे, चंद्रकांत पाटील, प्रसाद बुलबुले, राजेश वरक, महेश वरुटे यांनी केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes