कोल्हापूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ ! पोलिसावर झडप, चौघे जखमी!!
schedule11 Nov 25 person by visibility 490 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उच्चभू वस्ती समजल्या जाणाऱ्या ताराबाई पार्क आणि नागाळा पार्क परिसरात मंगळवारी बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. त्यामध्ये हॉटेल कामगार, पोलिसासह वनरक्षक विभागाचे कर्मचारी ही जखमी झाला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी रात्री काही वाहनधारकांना मेरी वेदर मैदान येथे रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याची चर्चा होती दरम्यान मंगळवारी सकाळी ताराबाई पारगेतील हॉटेल लगतच्या बंगल्याच्या कंपाउंड मधून बिबट्याने हॉटेलमध्ये प्रवेश केला हॉटेलच्या नावान परिसरात माळी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यावर त्यांनी झडप घातली
यामध्ये तो कर्मचारी जखमी झाला. यानंतर बिबट्या हॉटेलमध्ये शिरला हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या कर्मचाऱ्यावरही हल्ला केला. त्यानंतर बिबट्या हॉटेल लगत असलेल्या बीएसएनएलच्या कार्यालयात परिसरात शिरला. नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. भागात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले. बीएसएनएल कार्यालय परिसरातून बिबट्या महावितरण कार्यालयाच्या परिसरात शिरला दुसरीकडे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व सरकारी यंत्रणा सक्रिय झाली आहे ताराबाई पार्क व नागाळा पार्क परिसरात काही ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्ते बंद केले आहेत.