कत्तल केलेल्या झाडांना श्रद्धांजली वाहून प्रशासनाचा निषेध
schedule10 Nov 25 person by visibility 32 categoryमहानगरपालिका
:महाराष्ट्र न्यूज वन : बेकायदेशीर वृक्षतोड करणारा मुकादम आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही एक महिना उलटल्यावर सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या प्रशासनाचा, कोल्हापूर नेक्स्टच्यावतीने तोडलेल्या झाडांच्या ओंडक्याला श्रद्धांजली अर्पून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
आठ ऑक्टोंबर रोजी उभा मारुती चौक परिसरामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून ३ झाडांची कत्तल करण्यात आली. याबाबत दुसऱ्या दिवशी कोल्हापूर नेक्स्टने संबंधित मुकादम आणि ठेकेदार यांच्यावर तातडीने कारवाईची मागणी केली होती. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर आणि पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रा़ंबरे यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये वृक्षतोड करणारे मुकादम आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा मुकादम अथवा ठेकेदारावर कोणतीही कारवाई प्रस्तावित झालेली नाही. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता महानगरपालिकेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे चौकात कोल्हापूर नेक्स्टचे कार्यकर्ते जमले. त्यानंतर त्यांनी कत्तल केलेल्या झाडाच्या ओंडक्याला हार फाइल वाहिली आणि मिनिटभर स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली . या आठवड्यात संबंधितांवर कारवाई झाली नाही तर पुढील आठवड्यात महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करणार." असा सज्जड इशारा निमंत्रक चंद्रकांत चव्हाण यांनी दिला. यावेळी संघटनेचे अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे प्रदीप उलपे, विजयसिंह खाडे पाटील, स्वाती कदम, ओंकार गोसावी, अमित टिकले, योगेश जोशी आदी उपस्थित होते