राजारामपुरीतील रस्ते होणार चकाचक,दहा कोटीचा निधी मंजूर -आमदार राजेश क्षीरसागर
schedule10 Nov 25 person by visibility 19 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजारामपुरी परिसरातील रस्त्यांच्या कामांसाठी नगरविकास व नियोजन विभागाकडून १० कोटीं रुपयांचा निधी मंजूर झाला. त्या अंतर्गत राजारामपुरी परिसरातील रस्ते आगामी काळात वाहतुकीसाठी दर्जेदार व सुरक्षित होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
हा निधी देत असताना विकास कामांचा दर्जा योग्य असावा. नागरिकांकडून कोणतीही तक्रार येता कामा नये. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत ठेकेदार आणि संबधित अधिकारी यांच्यावरही जबाबदारी निश्चिती करण्यात आली आहे. रस्त्यांचा दर्जा योग्यच असावा, ही आग्रही भूमिका आहे. येत्या काळात शहर खड्डेमुक्त करून नागरिकांना दर्जेदार, टिकावू आणि गुणवत्तापूर्ण रस्ते देण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले. या निधीतून ,कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील राजारामपुरी येथील संजय हॉटेल ते माऊली पुतळ्याकडे जाणारा रस्ता व परिसर पेव्हर पद्धतीने डांबरीकरण व काँन्क्रीटीकरण करणे. राजारामपुरी येथील जनता बझार ते मारुती मंदिराकडे जाणारा रस्ता व परिसर पेव्हर पद्धतीने डांबरीकरण व काँन्क्रीटीकरण करणे. राजारामपुरी स्वामी पाणीपुरवठा ते राहुल जाधव घर रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे. राजारामपुरी अंतर्गत नक्षत्र गार्डन ते बँक ऑफ बडोदा रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे. राजारामपुरी अंतर्गत कोरगावकर हॉल ते सुर्यकांत पाटील घर (कारेकर) रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे. सावली बंगला ते पियुष पितळकर ते राजारामपुरी पोलीस ठाणेपर्यंत रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे. राजारामपुरी अंतर्गत शिवाजी हौसिंग सोसायटी वाचनालय ते चंद्रशेखर पाटील घर राजारामपुरी १२ वी गल्ली ते तुळशीदास जाधव घरापर्यंत रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण. प्रसन्न माने घर ते आर.डी. पाटील घरापर्यंत रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे. संकपाळ घर ते मींच ते कामगार कल्याण हॉल रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण. राजारामपुरी ६ वी गल्ली ते विक्रम पाटील घर ते अनिल कदम घरापर्यंत रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे. राजारामपुरी ६ वी गल्ली सत्यम शिवम आनंद अपार्टमेंट परिसर रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे. भीमा स्मिमिंग टँक ते राधेय क्रीडा मंडळ ते जाधव घरापर्यंत रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण या कामांचा समावेश आहे.