Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजज डडटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शनकोल्हापुरात शुक्रवारी रंगणार प्रिय शिरीष मैफल, विश्वजीत बोरवणकर, पारुल मिश्रांचे सादरीकरण

जाहिरात

 

खोल खंडोबा- शिपुगडे तालीम परिसरातील विकासकामांचे उद्घाटन

schedule10 Nov 25 person by visibility 309 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन : खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांचा युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ झाला.खासदार महाडिक यांच्या फंडातून खोल खंडोबा आणि शिपुगडे तालीम परिसरातील विकास कामांसाठी निधी देण्यात आला आहे. 
 खोल खंडोबा हॉल परिसरातील वेल्हाळ बाग येथे पॅसेजचे कॉंक्रीटीकरण आणि गटर कामांसाठी २० लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामाचे उद्घाटन, यूथ आयकॉन महाडिक, माजी नगरसेवक किरण शिराळे यांच्या हस्ते झाले. या या प्रभागाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी, खासदार  महाडिक कटिबध्द असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. दरम्यान प्रभागातील नागरिकांनी कृष्णराज महाडिक यांची  मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी  विशाल शिराळे सुरेश काळे, बाळासो कद्रे, अमरसिंह शिंदे, तात्या यादव, अमोल लिंगम, युवराज पोवार, सुनील पाटील यांच्यासह वेल्हाळबाग परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तर माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि माजी महापौर सुनंदा मोरे यांच्या प्रभागातील शिपुगडे तालीम जवळचा कॉंक्रीट पॅसेज बनवण्यासाठी १० लाख रूपयांचा निधी मंजुर झाला. येथेही कृष्णराज महाडिक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  पृथ्वीराज मोरे संतोष भोसले, सागर दळवी, सुनील पाटील, राहूल घाटगे, रणजित रजपूत, आर के जाधव, किशोर घाटगे, धिरज मुळे, अमेय भालकर, निलेश हंकारे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes