डॉ.विवेक सावंत यांचे रविवारी व्याख्यान
schedule20 Jun 24 person by visibility 560 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे मुख्य मार्गदर्शक संगणकतज्ज्ञ डॉ.विवेक सावंत यांचे ‘कृत्रिम बुध्दिमत्तेची क्षितिजे आणि मानव’ या विषयावर व्याख्यान रविवार 23 जून रोजी सायंकाळी चार वाजता पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विनोदकुमार लोहिया आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समिती, कोल्हापूरतर्फे व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 11 एप्रिल 2024 रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. त्यांच्या सामाजिक, वाड्.मयीन, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा विचार करता त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. तरी सदर व्याख्यानास शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.जी.पी.माळी व सचिव विश्वास सुतार यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.