भंडारी ग्रुपच्या कांदा-लसूण चटणीचे लोकार्पण
schedule18 May 23 person by visibility 262 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मसाले आणि ड्रायफ्रूट उद्योग क्षेत्रातील नामांकित भंडारी ग्रुपतर्फे कांदा लसूण मसाला चटणीचे लोकार्पण करण्यात आले. भंडारी ग्रुपतर्फे हॉटेल सयाजी येथे स्नेहमेळावा झाला. ग्रुपचे नामदेव भंडारी आणि मंगल भंडारी यांच्या हस्ते नवीन मसाला चटणीचे लोकार्पण झाले. यावेळी भंडारी ग्रुपचे व्यवस्थापक विजय भंडारी, सदस्य विजय देसाई, मुन्ना चौधरी, सोमनाथ विभूते, अमोल पाटील, सुशांत भंडारी, सागर शिंगटे, राजेंद्र नाईक उपस्थित होते.