कोल्हापुरातील पाच उद्योजक-व्यावसायिकांचा सोमवारी सन्मान
schedule18 May 23 person by visibility 520 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील पाच उद्योजक-व्यावसायिकांचा सोमवारी (ता.२२ मे) सन्मान करण्यात येणार आहे. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर शाखेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी चार वाजता कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यामध्ये बांधकाम व्यावसायिक अजयसिंह व्ही देसाई, वैशाली विजय जाधव, चिपडे सराफच्या सोनाली चिपडे, पॉप्युलर अॅटोमोबाइल्सचे उदय लोखंडे, इस्लामपूर येथील सर्जेराव प्रतिष्ठानचे सर्जेराव यादव यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी उद्योजक संग्राम पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे सल्लागार आदेश बांदेकर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला कोल्हापूर शाखाध्यक्ष राजन चौगुले, बाबा खोडवे, संघटक सुशील हंजे, उत्तम पाटील, धनंजय पाटील, तुषार पाटील, स्वप्नजा घाटगे, मोहन वाईंगडे उपस्थित होते.