कोल्हापूरचा चित्रकारांचा ग्वाल्हेरमध्ये विशेष सन्मान
schedule26 Nov 23 person by visibility 664 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :
कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रकारांचा ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे कल्पतरू आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रो. वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे या राष्ट्रीय रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी या आर्ट गॅलरीचे उद्घाटन कोल्हापूरच्या चित्रकारांच्या सहभागाने झाले. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रमोद कुमार जोशी यांनी कोल्हापूरच्या चित्रकारांची स्वागत केले
कोल्हापूरच्या मातीशी आमची नाळ जुळली असून प्रो. वासंती जोशी हे अभिनेते चंद्रकांत मांडरे यांच्याकडे कला संस्कृतीचे धडे घेतले. त्यांच्या नावे ग्वाल्हेर मध्ये आम्ही कल्पतरू आर्ट गॅलरी सुरू करत आहोत त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूरचा कलाकारांचा सन्मान करण्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील चित्रकारांचे ग्वाल्हेर येथे २५ ते २६ नोव्हेंबर २०२३ अखेर चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन आयोजित केले होते. या चित्रकारांमध्ये चित्रकार प्राचार्य अजय दळवी. प्राचार्य राजेंद्र हंकारे , शिवाजी मस्के ,प्रशांत जाधव विजय टिपुगडे, नागेश हंकारे ,धीरज सुतार, सूर्यकांत निंबाळकर, अरुण सुतार, संपत नायकवडी , जगन्नाथ भोसले, अभिजीत कांबळे, मनोज सुतार बबन माने ,श्रीरंग मोरे सुनील पंडित, रमण लोहार, अनिल अहिरे विजय उपाध्ये आदी कलाकारांचा सहभाग आहे. दरम्यान प्रमोद कुमार जोशी यांनी प्रो वासंती जोशी यांचे कोल्हापूरशी असलेले नातेसंबंध आणि आठवणी यांच्या स्मृतीस उजाळा दिला. कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रो. डॉ गणेश तरतरे, चित्रकला विभाग प्रमुख जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई अध्यक्ष प्रो डॉ. सरोज भार्गव उपस्थित होते
चित्रकार प्रशांत जाधव यांनी अभिजात वास्तववादी चित्रशैली आणि कोल्हापूरच्या कलांकराविषयी माहिती दिली. चित्रकारांच्यावतीने डॉ. वासंती जोशी यांची प्रतिमा भेट दिले. याप्रसंगी चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांनी अभिनेते चित्रकार चंद्रकांत मांढरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव प्रो बळवंत सिंह भदोरिया कोषाध्यक्ष पुनीत जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्रेयी शुक्ल यांनी केले