कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर अपघात, मोटारसायकलस्वार ठार
schedule02 Aug 22 person by visibility 518 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर गारगोटी रस्त्यांवर एसटीच्या धडकेत मोटारसायकस्वार जागीच ठार झाला. त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. करवीर पोलिस ठाण्यात या प्रकरणी एसटी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर गारगोटी रस्त्यांवर घोडके मळा येथे कोल्हापूरकडे येणाऱ्या मोटार सायकलला कोल्हापूर नंदगाव एसटीने जोरदार धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकलस्वार चंदर तुकाराम कांबळे (वय ४६, रा. आंबेडकर चौक, नागाव, ता. करवीर) जागीच ठार झाला. त्याची पत्नी सारिका ही जखमी झाली. एसटीने राँगसाईडने धडक मारल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर एसटीचालक संदीप गणपती पाटील (रा. चंद्रे, ता. राधानगरी) हा स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.