जोतिबा यात्रेत जिपची आरोग्य यंत्रणा २४ तास कार्यरत : जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे
schedule06 Apr 23 person by visibility 875 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जोतिबा यात्रेच्या कालावधीत भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा २४ तास उपलब्ध राहिली. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी दिली.
भाविकांच्या आरोग्यविषयक सेवेसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जोतिबा मंदिर परिसरात तीन वैद्यकीय पथके कार्यरत होती. पहिले पथक तालुका दवाखाना येथे, दुसरे पथक मंदिर परिसरात तर तिसरे पथक गायमुख परिसर येथे कार्यरत होते. सोळा वैद्यकीय अधिकारी, २१ समुदाय आरोग्य अधिकारीसह एकूण २२३ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. तीन ते पाच एप्रिल या कालावधीत ९७१ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
यात्रा कालावधीत १८ रुग्ण्वाहिका विविध ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध होत्या. पाणी शुद्धीकरणासाठी तेरा पथके कार्यरत होती. यामध्ये ३४ आरोग्य सहायक व ६९ आरोग्य सेवकांचा समावेश होता. जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राम्घ्ध्ये वैद्यकीय सुविधा पुरविल्या. केखले, बोरपाडळे, भुये, वडणगे या चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा २४ तास सुरू आहेत.