भारती हॉस्पिटलतर्फे जोतिबा डोंगरावर मोफत आरोग्य तपासणी
schedule05 Apr 23 person by visibility 360 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल, मंगळवार पेठ, कोल्हापूर यांच्या वतीने श्री क्षेत्र जोतिबा चैत्री यात्रेनिमित्त डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.अभिनंदन मुके यांच्या मार्गदर्शनाखाली उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित शिंदे, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद पाटील, डॉ. अगघा किणींगे, डॉ. नितीन कदम, डॉ. पल्लवी व्यवहारे , डॉ. खुशबू कुमावत, डॉ. अर्चना यादव, डॉ. अमेय पोकळे व डॉ. प्रणोती चिले हे वैद्यकीय अधिकारी, यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरात घेण्यात आलेल्या या तपासणी शिबिराचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला. श्वसन, हृदय विकार, पोटाचे विकार, मूळव्याध, मुतखडा, यकृत, त्वचा विकार, केस गळती, महिलांचे आजार, बालकांचे आजार आदी विविध प्रकारच्या आजारांची तपासणी केली.