संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे नोव्हेंबरमध्ये अधिवेशन ! अध्यक्षपदी खंडेराव जगदाळे, स्वागताध्यक्षपदी संजय घोडावत !!
schedule26 Sep 23 person by visibility 195 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
अखिल महाराष्ट्र मध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्य अधिवेशन १७ व १८ नोव्हेंबर २०२३ रोजी संजय घोडावत विद्यापीठ येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांची निवड झाली. घोडावत युनिव्हर्सिटीचे संस्थापक संजय घोडावत हे स्वागताध्यक्ष आहेत.
या संमेलनास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत असे संयोजकांनी म्हटले आहे. खासदार, आमदार, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह राज्यभरातील चार हजार मुख्याध्यापक संमेलनास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष केर भाऊ ढोमसे यांनी दिली आहे.
या संमेलनात विविध शैक्षणिक समस्या याकरिता विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र येथील तज्ञांकडून प्रबंध सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, प्रकाश देशमुख, कोषाध्यक्ष विलास भारसाकडे , हिंदुराव जाधव, संजय हिपरकर, अशोक मोरे, दत्तात्रय कदम, मनोहर पवार, विनोद पाटील, विश्वास काटकर,गौतम पाटील उपस्थित होते.