Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेच्या हद्दवाढीत सहभागी व्हा, तुमची सर्व जबाबदारी घेऊ - महापौर रुपाराणी निकमगोकुळसाठी मुख्यमंत्री सांगतील तसे महायुतीचे पॅनेल – मंत्री हसन मुश्रीफपदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफजिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !उपाध्यक्षांनी पॉवर टिलर चालवत केली चिखलणी, शेतकऱ्यांसोबत लुटला झुणका भाकरीचा आस्वाददूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मुदतवाढएक दिवस बळीराजासाठी, पालकमंत्र्यांनी केली भात रोप लावण ! वृक्षारोपणाचा  कृतिशील धडा, बोरपाडळेतील खडके अॅकेडमीचा पर्यावरणवादी उपक्रमप्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभ

जाहिरात

 

महापालिकेच्या हद्दवाढीत सहभागी व्हा, तुमची सर्व जबाबदारी घेऊ - महापौर रुपाराणी निकम

schedule14 Jul 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मोरेवाडी, पाचगांव, आरकेनगर परिरातील पंचायत सदस्य तसेच नागरीक या ठिकाणी आलेत त्यांना चांगल्या पध्दतीने कसे पाणी देता येईल याचा अभ्यास करुन त्याचे नियोजन करु.  काळम्मवाडी धरणातील पाणी उपसा बंद असल्याने बालिंगा, शिंगणापूर, नागदेववाडी येथून होणारा पाणी पुरवठा कशा पध्दतीने आपल्यापर्यत करता येईल याचे नियोजन करु. शहराच्या हद्दवाढीमध्ये या, तुमची सर्व जबाबदारी आंम्ही घेऊ. या भागाला पाणी पुरवठा सुरळीत करु. पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि अनधिकृत मोटारी जप्त करण्यासाठी महापालिकेच्या पथकाला माहिती द्यावी’असे आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी केले.

महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात मोरेवाडी, पाचगाव आणि आर.के.नगर परिसरातील पंचायत सदस्य तसेच नागरिकांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आरकेनगर, मोरेवाडी आणि पाचगाव परिसरातील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका पाणी पुरवठा नियोजनाचा सखोल अभ्यास करत असून, या परिसरातील कनेक्शनधारकांना किमान तीन दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

 जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी, ‘पूर्वी सुभाषनगर पंपिंगवरून राजेंद्रनगर, मोरेवाडी, पाचगाव व वैभववाडी येथे पाणी दिले जात होते. मात्र, काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने सध्या तेथील उपसा पूर्णपणे बंद आहे. सध्या शहराला शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. या ठिकाणावरुन होणारा दैनंदिन पाणी पुरवठा ४० ते ५० एमएलडी पाणी कमी मिळत आहे. या भागाला ३ ते ४ दिवसांतून एकदा पाणी देण्याचे नवे शेड्युल निश्चित करण्यात येईल. या भागातील ग्रामपंचायतींची ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच येथे अनधिकृत कनेक्शन्स आणि थेट मोटारी लावण्याचे प्रमाण जास्त आहे. ही अनधिकृत नळ जोडणी शोधण्याची आणि मोटारी जप्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी घ्यावी.’ असे आवाहन केले.

      पाचगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सागर दळवी यांनी, "महापालिकेचे पाणी चांगल्या दर्जाचे असल्याने आम्हाला त्याची सवय झाली आहे. आमचा हद्दवाढीत येण्यास कोणताही विरोध नसून तसे पत्र आम्ही पूर्वीच दिले आहे असे नमूद केले उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, गटनेते शारगंधर देशमुख, आदिल फरास, नगरसेवक विजेंद्र माने, नगरसेविका राजनंदा महाडीक, मोरेवाडी माजी उपसरपंच संजय वास्कर, सदस्य संभाजी मोरे, अमोल गायकवाड, अमोल गवळी, स्वप्निल गाडगीळ, अक्षय गाडगीळ, मनोज बागे, मिलिंद शेटे, मोरेवाडीचे प्रमोद हुदले, संभाजी मोरे, आनंदा मोरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes