Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन ! तर सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र !! राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएचडीमहापालिकेच्या हद्दवाढीत सहभागी व्हा, तुमची सर्व जबाबदारी घेऊ - महापौर रुपाराणी निकमगोकुळसाठी मुख्यमंत्री सांगतील तसे महायुतीचे पॅनेल – मंत्री हसन मुश्रीफपदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफजिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !उपाध्यक्षांनी पॉवर टिलर चालवत केली चिखलणी, शेतकऱ्यांसोबत लुटला झुणका भाकरीचा आस्वाददूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मुदतवाढ

जाहिरात

 

गोकुळसाठी मुख्यमंत्री सांगतील तसे महायुतीचे पॅनेल – मंत्री हसन मुश्रीफ

schedule13 Jul 26 person by visibility 170 categoryउद्योगजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर   : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महायुतीचे पॅनेल निश्चित विजयी होणार असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. त्याचवेळी मंत्री मुश्रीफ यांनी,‘गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीचे पॅनेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तसे होईल.’असे स्पष्ट केले. ते, सोमवारी, (१३ जुलै २०२६) कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. सध्या गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ठराव दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात गोकुळसाठी मतदार यादी घोषित होईल. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडीतील नेतेमंडळीत आरोप, प्रत्यारोपही रंगले. गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी, ‘ माजी चेअरमन विश्वास पाटील हेच गोकुळचे बाप आहेत.’असे विधान केले होते. त्यासंबंधीही पत्रकारांनी मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केल्यावर ते म्हणाले,‘ स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर हेच गोकुळचे बाप आहेत.’असे स्पष्ट केले. महायुतीतील भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी, गोकुळच्या कामकाजावरुन मंत्री मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत आहेत. याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ यांनी राजकारणात संयम महत्वाचा असतो. अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे आहे.’असा सूचक इशाराही दिला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes