जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule13 Jul 26 person by visibility 240 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कृषी - पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा होय असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.
शासकीय विश्रामगातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा वार्षिक योजना 2026 - 27 चारा उत्पादन कार्यक्रमातर्गंत,पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
जिल्हा परिषद अध्यक्ष, श्रीमती शिल्पा खोत,जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जास्मिन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, महिला बाल कल्याण सभापती विद्या पाटील, शिक्षण सभापती शितल यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प संतोष जोशी आदी उपस्थित होते .
शेतकऱ्यानी पशुधन प्रयत्नपूर्वक जोपासावे.तसेच दुग्ध व कृषी क्षेत्रातून शेतकऱ्यांनी स्वतःसह कुटुंबियांचे अर्थाजन करावे असा सल्ला देवून,लोकहिताची सच्ची चळवळ म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाहावे असे आवाहन ही पालकमंत्री आबिटकर यांनी याप्रसंगी केले. या कार्यशाळेच्या अनुषंगाने, पशुधनातील आहाराचे व्यवस्थापन या विषयावर सहा.आयुक्त डॉ. सॅम लुद्रिक,निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा निर्मिती या विषयावर सहा.आयुक्त डॉ. अविनाश चव्हाण तर पशुधनाच्या वंधत्व निवारणामध्ये चारा पिकांचे महत्त्व या विषयावर करवीर तालुक्यातील पवैद सांगरूळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.यशवंत उमरदंड यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हयातील उपस्थित शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मका बियाणांचे वाटप करण्यात आले.
डॉ. प्रमोद बाबर म्हणाले, आपल्या जिल्ह्यात सुमारे साडे आठ लाखांहून अधिक पशुधन आहे .तसेच सकस हिरवा चारा निर्मितीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ .प्रसाद भामरे यांनी आभार मानले.