महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !
schedule13 Jul 26 person by visibility 28 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विशेष समिती सभापतीपदी सुरेखा सुनिल ओटवकर यांची तर उपसभापतीपदी वैभव दिलीप माने, पाणी पुरवठा विशेष समिती सभापतीपद संगीता संजय सावंत यांची तर उपसभापतीपदी दिपा दीपक काटकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदी शिला अशोक सोनुले यांची तर उपसभापतीपदी पूजा सतिश पोवार यांची, क्रीडा समिती सभापतीपदी विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील यांची तर उपसभापतीपदी रोहित शिवाजीराव कवाळे यांची निवड करण्यात आली.
अप्पर जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, तेरा जुलै २०२६ रोजी झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. नगरसचिव सुनिल बिद्रे यांनी ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सहायक आयुक्त डॉ.विजय पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव यांनी मतमोजणी अधिकारी म्हणून काम पाहिले. आरोग्य विशेष समिती सभापतीपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका रुपाली अजित पोवार व भाजपच्या नगरसेविका सुरेखा सुनिल ओटवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये पोवार यांना चार मते तर ओटवकर यांना पाच मते पडली. ओटवकर या भाग क्र. 19-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत. आरोग्य विशेष समिती उपसभापती पदासाठी नगरसेक काँग्रेसचे दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला व शिवसेनेचे वैभव दिलीप माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मुल्ला यांना चार मते तर वैभव दिलीप माने यांना पाच मते पडली. माने हे हे प्रभाग क्र. 2-अ या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
पाणी पुरवठा विशेष समिती सभापतीपदासाठी नगरसेविका काँग्रेसच्या नगरसेविका अर्चना संदीप बिरांजे व शिवसेनेच्या संगीता संजय सावंत यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बिरांजे यांना चार मते तर सावंत यांना पाच मते पडली. सावंत या प्रभाग क्र. ९-क या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत. पाणी पुरवठा विशेष समिती उप-सभापतीपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका स्वालिया (आझिम) साहिल बागवान व भाजपच्या नगरसेविका दिपा दिपक काटकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बागवान यांना चार मते तर काटकर यांना पाच मते पडली. काटकर या हे प्रभाग क्र. 6-क या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत.
प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ.सुषमा संतोष जरग व शिवसेनेच्या नगरसेविका शिला अशोक सोनुले यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जरग यांना चार मते तर सोनुले यांना पाच मते पडली. सोनुले या प्रभाग क्र. 6-अ या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत. प्राथमिक शिक्षण समिती उप-सभापती पदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका स्वाती सचिन कांबळे व भाजपच्या नगरसेविका पूजा सतिश पोवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. कांबळे यांना चार मते तर पोवार यांना पाच मते पडली. पोवार या प्रभाग क्र. 16-क या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत. निवडीनंतर अप्पर जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी किरण कुलकर्णी, महापौर सौ.रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते शारंगधर देशमुख यांनी साऱ्यांचे अभिनंदन केले.
…………..
क्रीडा समिती सभापतिपदी विजयसिंह खाडे पाटील, उपसभापतिपदी रोहित कवाळे
क्रीडा समिती सभापतीपदी नगरसेवक विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील (भारतीय जनता पार्टी) यांची तर उपसभापतीपदी रोहित शिवाजीराव कवाळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांची चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. सभापतीपदासाठी नगरसेवक प्रशांत खेडकर व विजयसिंह खाडे-पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. खेडकर यांना चार मते तर खाडे-पाटील यांना चार मते पडली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी काढून निवडी घेण्यात आल्या यामध्ये विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील यांची चिठ्ठी निघालेने क्रिडा समिती सभापतीपदी विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील यांची निवड जाहिर करण्यात आली.खाडे हे 19-ड या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. उप-सभापती पदासाठी नगरसेवक रोहित शिवाजीराव कवाळे व अश्किन गणी आजरेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी काढुन निवडी घेण्यात आल्या यामध्ये रोहित शिवाजीराव कवाळे यांची चिठ्ठी निघालेने क्रीडा समिती सभापतीपदी रोहित शिवाजीराव कवाळे यांची निवड जाहिर करण्यात आली. कवाळे हे प्रभाग क्र. 15-अ या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.