Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफजिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !उपाध्यक्षांनी पॉवर टिलर चालवत केली चिखलणी, शेतकऱ्यांसोबत लुटला झुणका भाकरीचा आस्वाददूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मुदतवाढएक दिवस बळीराजासाठी, पालकमंत्र्यांनी केली भात रोप लावण ! वृक्षारोपणाचा  कृतिशील धडा, बोरपाडळेतील खडके अॅकेडमीचा पर्यावरणवादी उपक्रमप्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभकोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान चार वर्षात उभारणार, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मैदानाचा करार आषाढी वारीत रंगले संभाजीराजे ! युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजेही सहभागी !!

जाहिरात

 

उपाध्यक्षांनी पॉवर टिलर चालवत केली चिखलणी, शेतकऱ्यांसोबत लुटला झुणका भाकरीचा आस्वाद

schedule13 Jul 26 person by visibility 22 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतील "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी पेरणोली येंथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आजरा घनसाळ उत्पादक शेतकरी  मारुती परीट या शेतकऱ्याच्या शेतात पॉवर टिलर स्वतः चालवून चिखलणी केली. यानंतर चिखलात उतरुन त्यांनी भात रोप लावणंही केली. रोप लावणीनंतर शेतकऱ्यांसोबत बांधावर बसून झुणका भाकरीचा आस्वादही घेतला. सरपंच वनश्री    देसाई, उपसरपंच संकेत सावंत यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. 
       यावेळी जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना ताग व भाजीपाला बियाणे ही वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी जिल्हा परिषद सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असुन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच आजरा घनसाळची शुद्ध बियाणे निर्मिती, उत्पादन वाढ व मार्केटिंग साठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.  त्यांनी गावामध्ये वृक्षारोपण केले तसेच पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक शाळा,सेवा संस्था, दुध संस्थांना भेटी दिल्या.  यावेळी बांबू लागवडीची माहिती पाटलोबा पाटील यांनी दिली.
 यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सावंत, तानाजी देसाई, काका देसाई, अमृत देसाई, सुरेश कालेकर, सर्जेराव देसाई, अमर पवार, रवींद्र देसाई, शिवाजी देसाई, संदीप नवलकर , नामदेव मोहिते, धीरज सावंत, दत्तात्रय पाटील, जी.एम.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जालिंदर पांगिरे, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माने, गट विकास अधिकारी सुभाष सावंत सहायक, गटविकास अधिकारी सुरेश पुजारी, कृषि अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भुषण पाटील,  विस्तार अधिकारी पृथ्वीराज
 चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी अमिषा देवर्डेकर, सहाय्यक कृषि अधिकारी मनिषा पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes