कराडच्या घरफोड्याकडून सव्वा सहा लाखाचे दागिने हस्तगत
schedule01 Dec 23 person by visibility 272 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घरफोडीचा यशस्वी तपास करून संशीताकडून सव्वा सहा लाख रुपये किंमतीचे ११४ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. इब्राहिम अब्बासली शेख (वय 24 रा. सूर्यवंशी मळा कराड जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली .पन्हाळा तालुक्यातील शहापूर गावातील कृष्णात आनंदराव पाटील यांच्या घरात १८ नोव्हेंबर२०२३ रोजी चोरी झाली होती. चोरट्यानी कडी कोयंडा उचकटून सोन्याचे दागिने चोरून नेले होते .या प्रकरणी पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चोरीचा तपास सुरू केला. एलसीबी चे पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे यांना सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरी केल्याची माहिती मिळाली.संशयित काखे गावात येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी पन्हाळा काखे या गावाजवळ सापळा रचला. मोटरसायकलून आलेल्या संशयित इब्राहिम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 114 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, रणजीत कांबळे, संजय पडवळे ,संतोष पाटील, सुशील पाटील यांनी यशस्वी तपास केला.