दागिन्यांच्या शोरुममध्ये महिलेकडून दोन लाखाचे दागिने लंपास
schedule24 Sep 23 person by visibility 345 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
दागिन्याच्या शोरूम मध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत बुरखाधारी महिलेने दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स मध्ये ही घटना घडली असून राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे.सेल्सवुमन सुमया नियाज पठाण (वय ३५ रा राजारामपुरी) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास काळा बुरखा परिधान केलेली अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील, अंगाने सडपातळ, साडे पाच फुट उंच, चेहरा अर्धवट झाकलेली व हिंदी भाषा बोलणारी महिला महेंद्र ज्वेलर्स दुकानात दागिने खरेदीसाठी आली. सेल्सवुमन सुमया पठाण यांच्याकडे गेली. 'यापूर्वी मी आपल्या दुकानात येऊन गेलो आहे, असा विश्वास संपादन केला ' मला बांगडया खरेदी करायच्या आहेत. असे सांगून बांगड्यांची डिझाईन बघण्यासाठी मागवून घेतली.
सेल्सवुमनला बोलण्यात गुंतवून तीन तोळ्याच्या गोलाकार बांगडया हातोहात लंपास केल्या. फसवणूक झाल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये चोरी झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करीत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक आडसुळे तपास करत आहेत.