कोल्हापुरातील षोडशकरण महापर्वात उलगडतेय जैन तत्वज्ञान
schedule24 Sep 23 person by visibility 195 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील आरकेनगर परिसरात आयोजित दशलक्षण षोडशकरण महापर्वात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. या ठिकाणी कलात्मक मंडप उभारला आहे. प्रतिमा विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा कार्यक्रम पाच एकर परिसरात होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जैन तत्वज्ञानाचा उलगडा होत आहे.
दशलक्षण महापर्वात दररोज सकाळच्या सत्रात दशलक्षण विषयावर निर्यापक श्रमण मुनिश्री नियमसागर महाराज यांच्यासह पवित्र सागर महाराज , वृषभसागर महाराज , अभिनंदन सागर महाराज , सुपार्श्व सागर महाराज, आर्यिका श्रुतमती माता, समतामती माताजी , शुल्लक संयमसागर यांचे प्रवचन असते. जैन तत्वज्ञान आणि आचार विचार उलगडत आहे.
कार्यक्रमात षोडशकरण सह क्षमा - मार्दव - आर्जव - शौच - सत्य - संयम - तप - त्याग - आकिंचन्य - ब्रम्हचार्य या चातुर्मास मधील पर्युषण पर्वातील दशलक्षणाच्या विविध पैलूंचे विवेचन करत आहेत. या महापर्वासाठी प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेली तीन महिन्यांपासून अधिक काळ काम आहे. अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर, सचिव सुनील साजणे , खजानीय सचिन बहिर शेठ , कार्याध्यक्ष अमर मार्ले - ए के कामते - राजु शेठे , सचिन मिठारी, विशाल मिठारी, भूषण कावळे, वैभव कोगनुळे ,अमोल घोडके, अशोक बहिर शेठ, अवनीश जैन, सतीश पत्रावळे अनुपम भोजकर , अरुण तीर्थ, अमित बागे, सचिन पाटील, संजय टेंभुर्ले, अक्षय आडदांडेसह शंभरहून अधिक कार्यकर्ते सक्रिय आहेत.
या कार्यक्रमातंर्गत सोमवारी, (२५ सप्टेंबर २०२३ ) आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे* तर या सोहळ्याचा मुख्य आकर्षण असणारे आचार्य शक्ती भक्ती रॅली मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी होत आहे. या महापर्युषणपर्व सोहळ्याची एक ऑक्टोबर रोजी दुपारी दसरा चौक येथून प्रांरभ होवून प्रमुख मार्गावरून अहिंसा रॅली ने होणार आहे.