शिक्षक संघातर्फे जिप अधिकाऱ्यांचा सत्कार
schedule23 Jun 24 person by visibility 914 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीन े केल्याबद्दल प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघातर्फे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक संघाचे मार्गदर्शक राजाराम वरुटे, बाजीराव कांबळे, डी. पी. पाटील, प्रशांत पोतदार, मारुती दिंडे, अर्जून पाडळकर, रामचंद्र बचाटे, श्रीकांत माणगांवकर, नवनीत नाईक, श्रीकांत चव्हाण, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.