केंद्रीय दुग्धविकासमंत्र्यांना गोकुळ भेटीचे निमंत्रण ! चेअरमन विश्वास पाटीलसह संचालकांनी पुण्यात घेतली भेट
schedule22 May 23 person by visibility 392 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाने केंद्रीय मत्स्य पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची पुणे येथे भेट घेतली. याप्रसंगी चेअरमन पाटील यांनी केंद्रीय दुग्धविकासमंत्र्यांना गोकुळला भेट देण्यासंबंधीचे निमंत्रण दिले.
पुणे येथे एनडीडीबीच्यावतीने गोबर से समृद्धी या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्पा शुभारंभ सोमवारी (२२ मे) आयोजित केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हॉल पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री रूपाला यांच्या हस्ते होणार आहे .
या पार्श्वभूमीवर गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व अन्य संचालकांनी मंत्री रुपाला यांची पुणे येथे भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गोकुळची स्थापना,संकलन ,वार्षिक उलाढाल,विविध योजनाची माहिती गोकुळचे चेअरमन पाटील यांनी दिली.व गोकुळ दूध संघास भेट देण्यासंबंधी निमंत्रण देण्यात आले. मंत्री रुपाला यांनी, कोल्हापूर जिल्हा दौरा असेल त्यावेळी नक्कीच पहिल्यांदा गोकुळ दूध संघास भेट देऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे,अजित नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते