+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Apr 24 person by visibility 92 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत मतदारांना या दिवशी मतदान करता यावे म्हणून सात मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. औद्योगिक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदार संघ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. त्यांना मतदान करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला. 
 बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप चौगले, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे  उपस्थित होते. यावेळी मतदानादिवशीऔद्योगिक कारखाने, आस्थापना बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आणि याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. दरम्यान मतदाना दिवशी सुट्टी म्हणून सर्व औद्योगिक संघटनांनी सोमवारी ६ मे २०२४ या साप्ताहिक सुट्टी दिवशी कामकाज सुरू ठेवून मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी सुट्टी देण्याचे सर्वानुमते ठरले.