+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Mar 23 person by visibility 286 categoryलाइफस्टाइल
निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन–काडसिद्धेश्वर स्वामी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज केले.
गगनवाबडा येथील वेसरफ येथे आजरी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आजरीज इको व्हॅलीचे उदघाटन स्वामींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, येथे उभारलेल्या साखर कारखान्यामुळे आज येथील युवकांना रोजगार मिळाला, तसेच आजरीच इको व्हॅलीच्या माध्यमातून येथील जैवविविधतेचे जतन तर होईलच शिवाय ती समाजासमोर येईल. अशा प्रकारचे आणखी येथे प्रकल्प झाल्यास परिसराचा कायापालट होईल.
उद्योजक शेखर आजरी यांनी प्रास्ताविकात आजरीज इको व्हॅलीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी गगनबावडामध्ये निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील दाट जंगलामध्ये औषधी वनस्पतीही विपुल प्रमाणात आहेत. त्याच दृष्टीने वेसरफ येथे ४० वर्षांच्या अथक परिश्रमातून आजरीज इको व्हॅली, या नावे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले अग्रो टुरिझम सेंटर उभारले आहे. दहा एकरामध्ये विस्तारलेल्या व इको फ्रेंडली असणाऱ्या या सेंटरमध्ये १५ अडव्हेंचर प्रकार आहेत. पुढे पुढे त्याचा विस्तार करू. येथील आहार हा पूर्ण शाकाहारी असेल. विजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अशोक रोकडे यांनी आभार मानले.