पुणे पदवीधरमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी, ३५ अपक्ष ! महायुतीकडून स्मिता जाधव, महाविकासच्या हर्षदा देशमुख, शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोदी ! !
schedule10 Oct 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात यंदा उमेदवारांची भाऊगर्दी आहे. तब्बल ४७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये विविध राजकीय पक्षाकडील उमेदवारांची संख्या बारा आहे. तर ३५ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. पुण्यातील उमेदवारांची संख्या जास्त आहे.
महायुती अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, महाविकास आघाडीतंर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख जाधव, शिवसेना ठाकरे पक्षाकडून कोल्हापुरातील नगरसेवक सुनील जबरचंद मोदी हे उमेदवार आहेत. नेताजी काँग्रेस सेनेकडून पुणे येथील प्रा. आनंद जेठे, भारतीय लोकशक्ती पार्टीतर्फे हातकणंगले येथील डॉ. ईश्वर महादेव यमगर, निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे माढा तालुक्यातील प्रविण धनंजय कासार, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीतर्फे सांगोला तालुक्यातील डॉ.नाना लिंगाप्पा गावडे, सनय छत्रपती शासनतर्फे पुणे येथील प्रा. नामदेवराव जाधव, भीम सेनेचे उमेदवार राजेश कराडे, भारतीय जन सम्राट पार्टीकडून कोल्हापुरातील रुपाली राजेंद्र बोचकेरी, वंचित बहुजन आघाडीतर्फे तासगाव तालुक्यातील प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे, लोकराज्य जनता पार्टीतर्फे संजय भिकाजी मागाडे हे निवडणूक लढवित आहेत.
अपक्ष उमेदवार म्हणून सातारा येथील डॉ. अभिजीत बिचुकले, सोलापूर जिल्ह्यातील अभिमन्यू भानुदास आठवले, कपिल शंकर कोळी, पुणे येथील अॅड. अमोल दामोदर लोंढे, अरुणराज व्यंकट जाधव, उत्तम रंगा सकटे, रुपेश शिवाजी उंबरकर, निखिल विलास खंदारे, गणेश विलास सावंत,गणेश शिवराम लालगुडे, चिन्मय विजय नरके, चंद्रकांत परमेश्वर सावंत,हेमंत विजय जगताप, लक्ष्मण साहेबराव हरणावळ, सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील डॉ. उन्मेष गणपतराव देशमुख, कवठेमहांकाळ तालुक्यातील अर्जुन गोपाळ कर्पे, डॉ. तौहीद रफीकअहमद मुजावर, मिरज येथील सचिन महावीर पाटील, चिंचणी येथील सुमित दशरथ शिवणकर माळी, सोलापूर येथील प्रा. डॉ. अशोक बाबुराव गायकवाड, भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, सतीश शहाजी कुलाळ, जैनुद्दीन दस्तगीर शेख, दिपाली अशोक वाघमोडे, शिवानंद तोटाप्पा बिराजदार, राणी रणजीत खुर्द, पंढरपूर येथील संदीप औदुंबर मांडवे हे उमेदवार आहेत. सातारा जिल्ह्यातील सीए किशोर गजानन गुरसाळे, निवृत्ती केरू शिंदे, संजय मनोहर बनसोडे, महारुद्र कडाजी तिकुंडे, रोहित अनिल राऊत, कोल्हापुरातील एम. डी. देशमुख, प्रा नाथाजी चौगले, बाबासाहेब नामदेव जगताप निवडणूक लढवित आहेत.
सर्वाधिक मतदार कोल्हापुरात
पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक मतदार कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या एक लाख १४ हजार ५६२ इतकी आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८८,२०२ इतकी आहे. सांगली जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंख्या ८८,०७० आहे. सोलापूर जिल्ह्यात ४९,७२२ तर सातारा जिल्ह्यात ४७४६३ मतदार आहेत