Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातगोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणामान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारी

जाहिरात

 

सीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !

schedule09 Oct 26 person by visibility 51 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘पारदर्शक व्यवहार, नियमानुसार कामकाज आणि सभासदाभिमुख योजना’या त्रिसुत्रीचा मिलाफ घडवित कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. कर्मचारी सहकारी सोसायटीच्या कामकाजाचे अन्य संस्थांनीही अनुकरण करण्यासारखे आहे.’असे कौतुकोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी डॉ. जॅसमिन यांनी काढले. याप्रसंगी त्यांनी, सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या अभ्यासिकेची पाहणी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महिला व बालविकास  विभाग अधिकारी नितीन म्हस्के यांनी शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी साईक्स एक्स्टेंशन येथील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीला सदिच्छा भेट दिली. सोसायटीचे संचालक अजय शिंदे, रणजीत पाटील, उत्तम वावरे, अमर पाटील, साताप्पा मगदूम, सुकाणू समितीचे सदस्या प्रतिभा शिर्के, सोसायटीचे व्यवस्थापक विजयकुमार बोरगे यांनी सीईओ व अनय अधिकाऱ्यांचे स्वागत केले.   याप्रसंगी संचालकांनी सोसायटीच्या कामकाजाची माहिती दिली. ‘सोसायटीचे यंदा हिरकमहोत्सवी वर्ष आहे. जवळपास ३५०० सभासद आहेत. यंदा, सोसायटीला तीन कोटी साठ लाखाहून अधिक नफा झाला आहे. संस्थेचा नियमित कर्जाचा व्याजदर ९.२५ टक्के आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना ०.५० टक्के व्याज रिबेट मिळतो. यामुळे कर्जावरील व्याजदर हा ८.७५ टक्के आहे.

  सभासद कुटुंब कल्याण ठेव योजना, महालक्ष्मी फंड ठेववृद्धी योजना सभासदांच्या हिताच्या आहेत. सोसायटीतर्फे सभासदांना दिला जाणारा १२.५० टक्के लाभांश शैक्षणिक वर्षारंभी दिला जातो. मोबाइल अॅप, लॉकर सुविधा, संगणकीकृत कामकाज अशी विविध वैशिष्ट्ये आहेत. लॉकरची सुविधा आहे. सोसायटीच्या जिल्ह्यात गडहिंग्लज, हातकणंगले, मुदाळतिट्टा, बांबवडे येथे मिळून चार शाखा आहेत. सगळया स्वमालकीच्या आहेत. सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. सोसायटीत नोकर भरती करताना सभासदांच्या मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली. संचालकांच्या नातेवाईकांना नोकरभरतीत स्थान नाही. सोसायटीतर्फे दरवर्षी सेवानिवृत्त सभासद, गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येतो.’अशी माहिती संचालकांनी दिली. सीईओ डॉ. जॅसमिन यांनी सोसायटीच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पीपीटी तयार करावी. यशदाला सादर करावी. यशदाद्वारे इतर संस्थेपर्यंत सोसायटीची माहिती पोहोचेल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes