Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातगोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणामान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारी

जाहिरात

 

सर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

schedule09 Oct 26 person by visibility 30 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेणारे नेतृत्व विधान परिषदेत असणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचा पाठपुरावा करणारे तरुण, अभ्यासू नेतृत्व म्हणून शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्याकडे पाहिले जात आहे. तसेच पदवीधरांच्या आकांक्षा, रोजगार आणि कौशल्य विकासाच्या प्रश्नांवर डॉ. स्मिता जाधव प्रभावीपणे काम करतील’असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,  शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला.

 ‘शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, शिक्षकांवरील अनावश्यक अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व आवश्यक विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा करणे, तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगितले. पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्य विकासाला चालना देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअपसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधेवर भर देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी राजेश पांडे, शरद लाड, डॉ. प्रशम कोल्हे, धीरज घाटे, निरंजन डावखरे, मंजुषा नागपुरे, भैय्या माने, समित कदम जगदीश मुळीक, हेमंत रासने, निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes