Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधकजज डडजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती;  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुकसर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातगोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणा

जाहिरात

 

जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती;  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुक

schedule10 Oct 26 person by visibility 31 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन  : जिल्हा परिषद कोल्हापूरच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागातर्फे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा जिल्हा परिषदेच्या सोसायटी हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेतून बालकांच्या पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानांतर्गत विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपस्थित होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी प्रास्ताविकात पोषण माह व सेवा संकल्प अभियानाची माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी बालकाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी स्थानिक व सहज उपलब्ध अन्नपदार्थांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक व रुचकर पाककृतींचे कौतुक केले. 

सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी स्तरावर पात्र लाभार्थ्यांची नवीन नोंदणी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवून देणे, विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे तसेच अंगणवाडी परिसराची स्वच्छता राखणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले. गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या पालकांना शासकीय योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे व लाभ मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

 शिरोळ बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे यांनी आभार मानले. यावेळी स अधीक्षक नारायण चांदेकर, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, सौरव कांबळे, वरिष्ठ सहायक विद्या पाटील, राजेश मुरगी, कनिष्ठ सहायक अक्षय ढेवले उपस्थित होते. 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes