कोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद
schedule18 Sep 24 person by visibility 115 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातगाडी लावण्यावरुन उफाळलेल्या वादातून कोल्हापुरात एकाचा खून झाला. मंगळवारी (१७ सप्टेंबर) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शिवाजी रोडवरील आराम कॉर्नर येथेही घटना घडली. यामध्ये इम्रान इम्मामुद्दीन मुजावर (वय ३९ वर्षे) हे मयत झाले आहेत. या घटनेतील संशयित आरोपी युसूफ आलमजीत याला जुना राजवाडा पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
यासंबंधी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इम्रान मुजावरचा आराम कॉर्नर येथे कटलरी विक्रीचा व्यवसाय आहे. आराम कॉर्नर येथे ते स्टॉलवरुन कटलरी विक्री करतात. या स्टॉल शेजारीच पर्स विक्रीचा स्टॉल लावण्यावरुन संशियत आरोपी व इम्रान यांच्यामध्ये वाद झाला होता. मंगळवारी रात्री, संशयित आरोपी युसूफने मोबाइलवरुन कुठे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर काही मिनिटातच युसूफ हा घटनास्थळी पोहोचला. इम्रान मुजावर यांना बाजूला बोलावत चाकूचे वार केले. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. भांडण सुरू झाल्याचे दिसताच काहींनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले. दरम्यान चाकूचा घाव वर्मी लागल्याने इम्रान मुजावर खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी तत्काळ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच मुजावर यांचा मृत्यू झाला. इम्रानच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
………………..