कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर पुरस्कारांनी सन्मानित
schedule16 Sep 22 person by visibility 561 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : पाटबंधारे विभाग, कोल्हापूर उत्तरचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना ‘भारतरत्न विश्वेश्वरय्या जीवन गौरव पुरस्कार’प्रदान करण्यात आला. बांदिवडेकर यांनी पूरकाळात केलेल्या नियोजनाबद्दल अनंत शांती या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. अभियंता दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला.
राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले, कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य अधिकारी-कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप ठोंबरे यांच्या हस्ते व अनंत शांतीचे संस्थापक भगवान गुरव, अध्यक्षा माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी गव्हर्मेंट बँकेचे संचालक अजित पाटील, हेमा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, पतसंस्थेचे संचालक अशोक बने उपस्थित होते.