उत्तम फराकटे लिखित हिंगणमिठ्ठाचे बुधवारी प्रकाशन
schedule28 May 23 person by visibility 481 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील बांधकाम व्यावसायिक उत्तम फराकटे यांनी लिहिलेल्या ‘हिंगणमिठ्ठा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुधवारी (३१ मे २०२३) होत आहे.शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समारंभाचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे, न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह येथे सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार आहे. भाग्यश्री प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमाला साहित्येप्रमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.