चाचणी लेखापरीक्षण सुरू ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश : शौमिका महाडिक
schedule04 May 23 person by visibility 289 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. हे लेखापरीक्षण थांबवावे, तसेच चौकशी करू नये यासाठी गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
यावेळी गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यास हायकोर्टाने स्पष्टपणे नकार दिला आहे. तसेच याबाबतच्या पुढील सुनावणीसाठी ८ जून ही तारीख कोर्टाने दिली आहे.
कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने याबाबतच्या सुनावणीसाठी १ महिन्यानंतरची तारीख कोर्टाकडून देण्यात आली असून, तोपर्यंत पुढील कारवाई संदर्भात निर्देश देऊ नयेत अश्या सूचना शासनास दिलेल्या आहेत.
दरम्यान गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालाचे कामकाज सुरू ठेऊन शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गोकुळमधील सत्ताधारी गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.असे महाडिक यांनी म्हटले आहे.