वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे आरोग्य शिबिर
schedule04 Nov 23 person by visibility 446 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे शिवाजी मराठा हायस्कूल येथे आरोग्य शिबिर झाले. रक्तगट तपासणी झाली.
सुरवातीला प्रा. पियुषा नेजदार यांनी रक्तगट, त्यातील विविध घटक, त्यांचे महत्व, रक्तदानाचे महत्व यांची सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा.दिव्या शिर्के, प्रा. वैष्णवी निवेकर, इतर स्टाफ व विद्यार्थिनीच्या सहभागातून रक्तगट तपासणी करण्यात आली. उपक्रमांचे नियोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील. , व्हाईस चेअरमन डी.जी.किल्लेदार., संचालिकासई खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.