शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागप्रमुख प्रा. जगदीश सपकाळेंचे निधन
schedule26 Oct 24 person by visibility 1328 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. जगदीश भागवत सपकाळे यांचे शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) निधन झाले. मृत्यूसमयी ते ५५ वर्षाचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. ते मूळचे जळगाव येथील आहेत. जळगाव येथे त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शिवम असा परिवार आहे. दरम्यान प्रा. डॉ. सपकाळे हे शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य होते.