+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Mar 23 person by visibility 320 categoryआरोग्य
कोल्हापूरः“महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या विभागीय कार्यालयास कोल्हापूरमध्ये सरकारची जागा त्वरित उपलब्ध करून देऊ ” असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. होमिओपॅथच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे त्यांनी आश्वासित केले. यासाठी लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत बैठकिचे नियोजन करू असेही त्यांनी सांगितले.
 होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) ने आज आयोजित केलेल्या 'होमेसाकॉन २०२३ ' या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत केले. परिषद होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, ताराराणी चौक कोल्हापूरच्या सभागृहामध्ये झाली. परिषदचे औपचारिक उद्घाटन रोपटयास पाणी घालून करण्यात आले.
‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालयासाठी त्वरित जागा उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूरमध्ये वैद्यकिय संशोधन केंद्र सुरू होण्याचा मार्ग उपलब्ध होईल. या विभागीय कार्यालयाचा फायदा पाच जिल्हयातील सुमारे ८० महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांना होणार आहे. यामुळे कोल्हापूरातील वैद्यकिय क्षेत्र अधिक प्रगल्भ होईल. नवपदवीधरांनी कमी खर्चात उच्च आरोग्य सेवा देण्यासाठी योगदान दयावे.’असे महाडिक यांनी नमूद केले.
 मुंबई येथील डॉ. एम. एल ढवळे होमिओपॅथीक संशोधन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. बिपीन जैन यांनी 'आरोग्यासाठी भविष्यात होमिओपॅथी सक्षम पर्याय' जर सत्यात उतरवायचा असल्यास आपल्या देशामध्ये सार्वत्रिक आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीचा अंर्तभाव प्रभावीपणे करावा लागेल असे सांगितले.
डॉ. राहुल जोशी (मुंबई) यांनी “तात्काळ उद्वभवणाऱ्या आजारासाठी होमिओपॅथिची आवश्यकता" या विषयासंबंधी विवेचन केले. 'राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग २०२२ मधील बदल' या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा (गडहिंग्लज) यांनी आयोगाची रचना व उद्दिष्टये यासह त्याचा होमिओपॅथी औषधप्रणाली व शिक्षण यांच्या विकासावर होणारे सकारात्मक परिणाम विषद केले. डॉ. प्रशांत तांबोळी (मुंबई) यांनी “होमिओपॅथिचा संशोधन विकास" या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. संतोष रानडे, डॉ. कल्याणी कातकर, डॉ. श्रेयस पांचाल, आदींची व्याख्याने झाली. प्रारंभी होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून असोसिएशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. परिषदेच्या संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी प्रास्ताविकामध्ये 'आपला ग्रह आपले आरोग्य होमिओपॅथीसह' या परिषदेच्या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली. सचिव डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले. परिषदेसाठी डॉ. मंदार कुंटे, डॉ. अजित वलवणकर, डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. चेतन जोशी, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. महादेव गावडे, डॉ. शितल पाटील इत्यादिसह सुमारे ४०० होमिओपॅथ्स उपस्थित होते. जवळपास १००० होमिओपॅथ्सनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.