गव्हर्मेंट बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले, उपाध्यक्ष अजित पाटील
schedule17 May 23 person by visibility 216 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दि राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत दिनकर देवले यांची फेरनिवड करण्यात आली. बँकेच्या उपाध्यक्षपदी अजित पाटील यांची निवड झाली.
सरकारी नोकरांची बँक म्हणून राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेची ओळख आहे. या बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी (१७ मे) रोजी झाली. या बैठकीत अध्यक्ष- उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. सहाय्यक उपनिबंधक निळकंठ खरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. अध्यक्षपदासाठी शशिकांत तिवले यांचे नाव जेष्ठ संचालक रवींद्र पंदारे यांनी सुचविले. त्यास संचालक मधुकर पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी अजित पाटील यांचे नाव संचालक रोहित बांदिवडेकर यांनी सुचविले. त्यास संचालक विलास कुरणे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर तिवले व पाटील यांचा संचालकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी, गव्हर्नमेंट बँकेच्या व सभासदांच्या हिताला प्राधान्यक्रम देऊन कामकाज सुरू आहे. सभासदांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातील. अशी ग्वाही दिली.