+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Mar 24 person by visibility 155 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातही मीच अध्यक्ष होतो. आता हिरकमहोत्सवी वर्षातही मीच अध्यक्ष आहे. संस्थेचा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणजे मोठी कामगिरी असते. संस्थेच्या वाटचालीतील दोन्ही चांगल्या समारंभावेळी माझ्याकडे अध्यक्षपद राहिले. हा योगायोग आहे. आता गोकुळच्या अमृतमहोत्सवी वर्षातही मीच अध्यक्ष असेन असे नियतीचे संकेत असावेत. साऱ्यांच्या सदिच्छामुळे माझी प्रकृतीही उत्तम आहे.’असे उद्गगार अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी काढले. आणि उपस्थितामध्ये एकच हंशा पिकला.
निमित्त होते, गोकुळ दूध संघाच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे. कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालय येथे शनिवारी (१६ मार्च) हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, अजित नरके, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, अमर पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, करणसिंह गायकवाड, प्रा. किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, अंजना रेडेकर, कुंभीचे व्हाईस चेअरमन विश्वास पाटील, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नंबर आलेल्या प्राथमिक दूध संस्थांचा सत्कार, दूध व दुग्धजन्य वितरक पुस्कार सोहळा झाला. याप्रसंगी महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि टीएमआर मॅश व अॅटो सॅम्पलिंग मशिनचे उद्घाटनही झाले.
चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘ गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालकांच्या सभासदाभिमुख कारभारामुळे गोकुळचा दिवसेंदिवस विकास होत आहे. कोणत्याही संस्थेच्या वाटचालीत हिरकमहोत्सवी टप्पा हा साऱ्यांसाठी आनंदाचा, अभिमानास्पद असतो. सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलविणाऱ्या गोकुळचा हिरकमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ दिमाखात होत आहे. आज दूध उत्पादकांनी माझा व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा सत्कार केला. खरं तर, हा सत्कार साऱ्या संचालकांचा आहे. माझ्या दृष्टीने विशेष आनंददायी बाब म्हणजे, गोकुळच्या सुवर्णमहोत्सवी व हिरकमहोत्सवी वर्षी मी अध्यक्ष होतो. आता पुढील टप्पा हा संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा. आतापर्यंतचे योगायोग पाहिले की गोकुळच्या अमृतमहोत्सवी वर्षातही मीच अध्यक्ष असेन असे संकेत मिळत आहेत.’