+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Mar 24 person by visibility 1001 categoryउद्योग
‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’या नवीन पशुखाद्याचा व ‘महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश’ उत्पादनाचा विक्री शुभारंभ
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघातर्फे दूध उत्पादन वाढीसाठी महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ या नवीन पशुखाद्याचा व ‘महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश’ या उत्पादनाचा विक्री शुभारंभ करण्यात आला. नवीन कोहिनूर डायमंड पशुखाद्य हे आकर्षक ५० किलो बॅगमध्ये उपलब्ध आहे.गोकुळच्या हिरकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालकांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखानामार्फत जातिवंत दुधाळ गाय/ म्हैशीसाठी परिपूर्ण असलेले बी.आय.एस. टाईप १ चे नवीन प्रीमिअमचे पशुखाद्य तयार केले आहे. चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला असून सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. जातिवंत दुधाळ गाय/ म्हैशीसाठी परिपूर्ण असलेले, उत्तम आरोग्यासाठी तसेच भरघोस दूध आणि चांगल्या प्रतीच्या फॅट साठी बी.आय.एस. टाईप १ चे नवीन प्रीमिअमचे ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ या नवीन पशुखाद्याचे उत्पादन सुरु केले आहे.
  तसेच जनावरांना वाळलेल्या वैरणीची कमतरता भासू नये, टी.एम.आर.वीट जनावरांना फोडून खाऊ घालताना महिला दूध उत्पादकांना अडचणी येऊ नयेत, म्हणून संघाने याचा विचार करून नवीन स्वरुपात महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश हे उत्पादन २५ किलो बँग मध्ये उपलब्ध केले आहे. यामध्ये प्रथिने १० ते ११ टक्के व फॅट १.५ टक्के असून जनावरांची रवंत प्रक्रिया सुधारून दूधवाढ व गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे.या बाबतची विस्तृत माहिती दुध संस्थान परिपत्रकाद्वारे कळवली असून जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांकरिता गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ व ‘महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश’ या पशुखाद्याच्या उत्पादनाचा वापर करावा असे आवाहन संघाचे चेअरमन डोंगळे यांनी केले.
  यावेळी जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुखाद्य डॉ.व्ही.डी.पाटील, उपस्थित होते.