नंदगाव- गिरगाव रोडवर गोवा बनावटीची सहा लाखांची दारू जप्त
schedule24 Sep 23 person by visibility 268 categoryगुन्हे
राज्य उत्पादन विभागाची गिरगावात कारवाई
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने करवीर तालुक्यातील नंदगाव -गिरगांव रोडवर सहा लाखांचे विविध ब्रॅडचे गोवा बनावटीचे मद्य १८ लाखांची कार असा २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदेशीर मध्ये वाहतूक करणाऱ्या गजानान दिनकर पाटील (वय ४७ रा.रुईकर कॉलनी) यास अटक केली आहे.
महाराष्टात बंदी असलेले मद्य गोव्यातून एक व्यक्ती चोरून आणणार असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाला खबऱ्याकडून समजली. त्यानंतर भरारी पथकाने नंदगाव गिरगाव रोडवर सापळा रचला . रविवार दुपारी गोवा पासिंग असणारी महागडी जीप येताना दिसली. भरारी पथकाने चालकाला थांबवून जीपची तपासणी केली असता गोव्यातून आणलेल्या १८० मिलीच्या १२४८ मद्याच्या बाटल्या, ७५० मिलीच्या ३२४ बाटल्या, २००० मिलीच्या १२ बाटल्या असे ५५ बॉक्स मद्य जप्त केली. जीप व दारू असा २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई विभागीय उपआयुक्त व्ही. पी. चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, एस. एस. गोंदकर, दुय्यम निरीक्षक आर. जी. ऐवलुजे, कॉन्स्टेबल विलास पवार, सुशांत बनसोेडे, अमोल यादव, योगेश शेलार यांनी केली.