+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule16 May 23 person by visibility 170 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. 
आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा, कॉलेजमध्ये गवसतं. पण हे प्रेम यशस्वी होतंच असं नाही. पण पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर देतो. रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टूगेदर हा चित्रपट नक्कीच करून देईल चित्रपटातील कलाकारांनी सांगितले.